मुंबईः बॉलिवूडचे बुजूर्ग अभिनेते जितेंद्र उर्फ रवी कपूर यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या जुन्या घरी अर्थात गिरगावातील श्याम सदनमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं. जितेंद्र दरवर्षी न चुकता श्याम सदनातील गणपतीचं दर्शन घेतात.

 

महानायक अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांसारख्या सुपरस्टार्सच्या जमान्यात हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान निर्माण करणारे जितेंद्र यांनी गिरगावातील श्याम सदन म्हणजे पूर्वीची रामचंद्र बिल्डिंग सोडून पन्नासहून अधिक वर्ष झाली. तरीही ते दरवर्षी नियमित या ठिकाणी येऊन दर्शन घेतात.

 

जितेंद्र यांना नुकतंच राज्य शासनाच्या राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या सन्मानाबद्दल त्यांचा गिरगावात खास मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ज्यात जितेंद्र यांच्या चित्रपटातील नावांची गुंफण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.