Gold Silver Price : दिवाळीचा सण सुरु झाला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदी दोन्हीमध्ये घसरण नोंदवली जात आहे. सोनं चांदी स्वस्त झाल्यानं सणासुदीच्या काळात लोकांना स्वस्त सोन्याची भेट मिळाली आहे. सोनं आज 60,000 रुपयांच्या खाली गेले आहेत.
सकाळी सोन्याचे दर हे 59 हजार 903 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर होते. त्यानंतर सोन्याच्या दरात आणखी घसरण दिसून आली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत ते कालच्या तुलनेत 129 रुपये म्हणजेच 0.21 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. सध्या सोन्याचा दर हा 59 हजार 880 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचले आहेत. कालच्या फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव 60,009 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
चांदीच्या दरातही 700 रुपयांनी स्वस्त झाली
सोन्याव्यतिरिक्त आज चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. धनत्रयोदशीच्या आधी, कालच्या तुलनेत चांदी 1 टक्क्यांनी म्हणजेच 709 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदी 70 हजार 341 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात चांदी 70 हजार 450 रुपयांवर उघडली आहे. तेव्हापासून त्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. आज वायदे बाजारात चांदी 71 हजार 50 पये प्रति किलोवर बंद झाला.
जाणून घेऊयात प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे दर
चेन्नई- 24 कॅरेट सोने 61,250 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,200 रुपये प्रति किलोग्रॅम
दिल्ली- 24 कॅरेट सोने 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलोग्रॅम
कोलकाता- 24 कॅरेट सोने 61,250 रुपये प्रति 10 ग्रॅम,चांदी 73,200 रुपये प्रति किलोग्रॅम
मुंबई- 24 कॅरेट सोने 60,760 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलोग्रॅम
पुणे- 24 कॅरेट सोने 60,760 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये किलो
लखनौ- 24 कॅरेट सोने 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलो
जयपूर- 24 कॅरेट सोने 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलो
पाटणा- 24 कॅरेट सोने 60,810 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलो
गाझियाबाद- 24 कॅरेट सोने 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलो
नोएडा- 24 कॅरेट सोने 60,910 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 73,200 रुपये प्रति किलो
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं झालं स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या दरात घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात 0.1 टक्क्ची घसरण झाली आहे. अमेरिकेतही सोन्याचा भाव 0.2 टक्क्यांनी घसरला आहे. सोन्याव्यतिरिक्त जर आपण चांदीबद्दल बोललो तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 0.5 टक्क्यांनी घसरुन 22.41 डॉलर प्रति औंस झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: