India Vs England Match Records in World Cup: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने तब्बल 20 वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध शानदार विजय नोंदवला. यापूर्वी 2003 च्या विश्वचषकात भारतीय संघाने 82 धावांनी पराभव केला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने रविवारी (30 ऑक्टोबर) आपल्या सहाव्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने 20 वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध विजयाची नोंद केली आहे. यापूर्वी 2003 च्या विश्वचषकात भारतीय संघाने 82 धावांनी पराभव केला होता. यानंतर 3 सामने झाले. 2011 मध्ये सामना बरोबरीत सुटला होता. तर 2019 मध्ये इंग्लंडने 31 धावांनी पराभव केला होता. मात्र आता तिसऱ्या सामन्यात भारताने शानदार पद्धतीने विजय मिळवला. विश्वचषकात भारताविरुद्ध 100 धावांनी झालेला हा लाजिरवाणा पराभव इंग्लंड कधीही विसरू शकणार नाही.

20 वर्षांनी विजय अन् नेहराची आठवण

टीम इंडियाने यापूर्वी 2003 मध्ये इंग्लंडविरुद्ध 82 धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यातही टीम इंडियाची गोलंदाजी निर्णायक ठरली होती. माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने त्या सामन्यात 23 धावांत तब्बल सहा जणांना माघारी टीम इंडियाला सनसनाटी विजय मिळवून दिला होता. त्याच विजयाची आठवण करून देईल, अशी कामगिरी रविवारी इंग्लंडविरुद्ध शमी आणि बुमराहने केली. दोघांनी सात विकेट घेताना इंग्रजांच्या दांड्यांवर दांड्या गुल केल्या. 

वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत आणि इंग्लंड यांच्यात एकूण 9 एकदिवसीय सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने 4 जिंकले आहेत. इंग्लंडने केवळ चार सामने जिंकले. तर एक सामना बरोबरीत सुटला होता. एकूण एकदिवसीय सामन्यांमध्ये, भारताने इंग्लंडशी 107 सामने खेळले, त्यापैकी 57 सामने जिंकले. तर इंग्लंडने 44 सामने जिंकले. 2 सामने बरोबरीत आणि 3 अनिर्णित राहिले. या विजयानंतर भारतीय संघाने उपांत्य फेरीत जवळपास प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ शर्यतीतून बाहेर पडला आहे. 

इंग्लंडविरुद्ध भारताचा दबदबा

वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत आणि इंग्लंड यांच्यात एकूण 9 एकदिवसीय सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने 4 जिंकले आहेत. इंग्लंडने केवळ चार सामने जिंकले. तर एक सामना बरोबरीत सुटला होता. एकूण एकदिवसीय सामन्यांमध्ये, भारताने इंग्लंडशी 107 सामने खेळले, त्यापैकी 57 सामने जिंकले. तर इंग्लंडने 44 सामने जिंकले. 2 सामने बरोबरीत आणि 3 अनिर्णित राहिले.

100 धावांचा हा पराभव इंग्लंडसाठी अतिशय लाजिरवाणा आहे. एकदिवसीय विश्वचषकात धावांच्या बाबतीत भारताचा इंग्लंडवरचा हा सर्वात मोठा विजय आहे. असे अनेक विक्रम या सामन्यात झाले आहेत. यातील बहुतांश इंग्लंडसाठी लज्जास्पद आहेत. 

भारताचा इंग्लंडविरुद्धचा सर्वात मोठा विजय (धावांनी)

  • 100 धावांनी पराभूत, लखनौ, (2023)
  • 82 धावांनी पराभूत, डर्बन, (2003)
  • 63 धावांनी पराभूत, बर्मिंगहॅम, (1999)

एकदिवसीय विश्वचषकातील सामने जिंकण्याच्या बाबतीत न्यूझीलंडला मागे टाकले

  • 73 - ऑस्ट्रेलिया
  • 59 - भारत
  • 58 - न्यूझीलंड 
  • 50 - इंग्लंड
  • 47 - पाकिस्तान
  • 43 - साउथ आफ्रिका/वेस्टइंडीज
  • 40 - श्रीलंका

वर्ल्डकपमध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकणारा भारतीय कर्णधार

  • 11 विजय - महेंद्रसिंह धोनी
  • 8 विजय - सौरभ गांगुली
  • 6 विजय - रोहित शर्मा

शमी विरुद्ध बटलर (ओडीआयमध्ये हेड-टू-हेड)

  • 8 एकदिवसीय डाव
  • 57 धावा
  • 5 वेळा आऊट
  • 11.40 सरासरी

इतर महत्वाच्या बातम्या