बंगळूर : न्यूझीलंडने एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 41 व्या सामन्यात श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव करून पॉइंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानसाठी मोठी समस्या निर्माण केली आहे. न्यूझीलंडच्या विजयासह पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. या विजयासह न्यूझीलंडचे 10 गुण झाले आहेत. पराभूत झालेला श्रीलंका यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला होता.
न्यूझीलंड आणि भारताची उपांत्य फेरी निश्चित
न्यूझीलंडच्या विजयामुळे, पुन्हा एकदा 2019 ची झलक दिसेल, जेव्हा भारत न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळला होता. मात्र, त्यावेळी टीम इंडियाचा पराभव झाला होता. न्यूझीलंड 10 गुण आणि +0.743 च्या निव्वळ धावगतीने चौथ्या स्थानावर आहे. पात्र ठरलेली टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना क्रमांक 1 आणि 4 क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये खेळवला जाईल.
न्यूझीलंडशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संघही चौथ्या क्रमांकाच्या शर्यतीत आहेत, मात्र खराब नेट रनरेटमुळे या दोघांनाही शेवटचे सामने जिंकूनही पात्र ठरणे फार कठीण आहे. पाकिस्तानचा निव्वळ धावगती +0.036 आणि अफगाणिस्तानचा निगेटिव्ह -0.338 आहे.
संपूर्ण पॉइंट टेबलची स्थिती
प्रथम पात्र ठरलेला यजमान भारत 16 गुणांसह अव्वल स्थानावर हे. यानंतर दक्षिण आफ्रिका 12 णांसह दुस-या स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलिया 12 णांसह तिस-या स्थानावर आहे. भारताशिवाय दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाही पात्र ठरले आहेत. यानंतर चौथ्या उपांत्य फेरीचा प्रबळ दावेदार न्यूझीलंड 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
त्यानंतर पाकिस्तान 8 गुणांसह पाचव्या आणि अफगाणिस्तान 8 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. यानंतर बाहेर पडलेल्या संघांची सुरुवात होते, ज्यामध्ये इंग्लंड 4 गुणांसह सातव्या स्थानावर आहे, बांगलादेश 7 गुणांसह आठव्या स्थानावर आहे, श्रीलंका 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे आणि नेदरलँड 4 गुणांसह 10 स्थानावर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या