लंडन : विश्वचषकाच्या रणांगणात आज (गुरुवार) टीम इंडियाचा सामना जेसन होल्डरच्या वेस्ट इंडिजशी होत आहे. पहिल्या पाच सामन्यांत अपराजित असलेल्या भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपले स्थान कायम राखले आहे. विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानावर असून, भारताच्या खात्यात चार विजय आणि एका रद्द सामन्याचे मिळून नऊ गुण आहेत. आता विंडीजविरुद्धचा सामना जिंकला की, टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं तिकीट पक्कं होईल.


या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी चांगली बातमी मिळाली आहे. जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या पायाला झालेल्या दुखापतीमधून सावरला आहे. बुधवारी त्याने बराच वेळ नेट्समध्ये सरावदेखील केला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करत असताना भुवीच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे हा सामना अर्धवट सोडून भुवीला पव्हेलियनमध्ये परतावे लागले होते.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जायबंदी झालेल्या भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद शमीला अंतिम 11 जणांच्या संघात स्थान मिळाले. मिळालेल्या संधीचं शमीने सोनं केलं. शमीने 9.5 षटकात 40 धावा देत 4 गडी बाद केले. त्यामध्ये शेवटच्या शटकात घेतलेल्या हॅट्रीकचाही समावेश आहे.

भुवी फिट झाला आहे आणि शमीदेखील फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात या दोघांपैकी कोणाला संधी द्यायची? असा प्रश्न संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीला पडला आहे. याबाबत माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरला विचारले असता सचिनने भुवनेश्वर कुमारला पसंती दिली.

सचिन म्हणाला की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर चांगली कामगिरी करु शकतो. सुरुवातीच्या षटकात वेस्ट इंडिजचे खेळाडू जोरदार फटकेबाजी करतात. भुवनेश्वर कुमार ख्रिस गेलसारख्या स्फोटक फलंदाजांना रोखू शकतो.

व्हिडीओ पाहा



सचिन म्हणाला की, भुवनेश्वर फिट झाला आहे. ही टीमसाठी आनंदाची बातमी आहे. सराव करत असताना भुवनेश्वरमधील आत्मविश्वास पाहायला मिळत होता. भुवनेश्वर ज्या प्रकारची स्विंग गोलंदाजी करतो, ख्रिस गेलला अशा गोलंदाजीचा सामना करताना अडचण येते. त्यामुळे या सामन्यात भुवीची निवड उत्तम राहील.

...म्हणून सचिन तेंडुलकरचा नागरी सन्मान बीएमसीकडून रद्द | मुंबई | ABP Majha