मुंबई : विश्वचषकातील बांगलादेश विरुद्धचा पाकिस्तानचा सामना अद्याप सुरु असला तरी पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे. सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी आवश्यक असलेलं नेट रनरेट राखण्यात पाकिस्तानला अपयश आलेलं आहे. त्यामुळे बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकला तरी पाकिस्तानला मायदेशी परत जावं लागणार आहे.


पाकिस्तानच्या या अवस्थेमुळे मात्र सोशल मिडीयावरच्या विनोदांनी चांगलाच जोर धरला आहे. फेसबुक, ट्विटरवर जोरदार मिम्स शेअर केले जात आहेत. काहींनी तर पाकिस्तानच्या या अवस्थेला भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. इंदिरा गांधींच्या एका निर्णयामुळे पाकिस्तानला आज वर्ल्डकपमधून बाहेर पडावं लागलं असे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान असताना त्यांनी 1971 साली पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांगलादेशची निर्मिती केली नसती तर आज पाकिस्तानची बांगलादेशसमोर अशी अवस्था झाली नसती, असा अजब तर्क काहींनी लावला आहे.

पाकिस्तानचं उपांत्य फेरीची दार का बंद झालं? | एबीपी माझा



यासोबतच इतर अनेक भन्नाट मिम्स सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत




आयसीसीनेदेखील पाकिस्तानला ट्रोल केलं आहे.