इंदापूर : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण आज इंदापूर मधल्या कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडले. आज सकाळी इंदापुरात पोहचलेल्या पालखीचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले.


निमगाव केतकी मुक्कामी असलेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीने आज सकाळी इंदापूर नगरी मध्ये प्रवेश केला. इंदापूरमध्ये प्रवेश केल्यानंतर वाजत गाजत या पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात डोळ्याचं पारणं फेडणारं दुसरं रिंगण पार पडलं. या रिंगन सोहळ्याला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि कन्या अंकिता पाटील यांनी देखील हजेरी लावली.

संत तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूर येथे मुक्कामी असणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने आज सकाळी फलटण येथुन प्रस्थान केले होते. त्यानंतर दिवसभराचा प्रवास करुन ही पालखी बरड येथे आज मुक्कामी असणार आहे. ही पालखी उद्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण बेलवंडीत पार पडलं आहे. यावेळी शेकडो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी रिंगण पाहायला गर्दी केली होती. तर आज इंदापूर येथे पार पडलेलं तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण पाहायला देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.



वयवर्ष 90, वारी 45वी, आजीबाईंची अपार भक्ती | काटेवाडी | ABP Majha