नवी दिल्ली : दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर काल (बुधवारी) खेळवण्यात आलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 53 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात सर्वांचं लक्ष आशिष नेहराच्या निवृत्तीकडेच होतं. मात्र, याचदरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली डगआऊटमधून वॉकी-टॉकीवर बोलत असल्याचं दिसून आलं.

टीव्हीवर हे दृश्य दाखवताच अनेकांनी त्याच्या या कृतीवर आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. पण याप्रकरणी कोहलीला आयसीसीकडून क्लीन चिट देण्यात आली आहे.

'मॅचदरम्यान वॉकी-टॉकीचा वापर हा टीम स्टाफ आणि ड्रेसिंग रुममध्ये संपर्कासाठी केला जातो. कोहलीनं आधीच भष्ट्राचारविरोधी पथकाची परवानगी घेऊन वॉकी-टॉकीचा वापर केला होता.' अशी माहिती आयसीसीच्या अधिकाऱ्यानं दिली.


कोहलीनं वॉकी-टॉकीचा वापर करुन आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. असं काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. पण आयसीसीनं क्लिन चीट दिल्यानं कोहलीला दिलासा मिळाला आहे.

आयसीसीच्या नियमानुसार, ड्रेसिंग रुममध्ये मोबाइल फोनच्या वापरावर खेळाडूंना बंदी आहे. पण खेळाडू आणि स्टाफ वॉकी टॉकीचा वापर करु शकतात.

संबंधित बातम्या :

VIDEO : हवेत सूर मारुन पांड्यानं टिपला अप्रतिम झेल!


नेहराला शानदार निरोप, भारताची न्यूझीलंडवर 53 धावांनी मात


कारकीर्दीतील शेवटचा चेंडू आणि नेहरा!