Hocky Asia Cup 2022: दक्षिण कोरियाने हॉकी आशिया चषक 2022 चं विजेतेपद पटकावलं आहे. या आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोरियन संघानं मलेशियाचा 2-1 असा पराभव करून ट्रॉफी जिंकली. हॉकी आशिया चषक स्पर्धेत कोरियाच्या संघाचं हे विक्रमी पाचवं विजेतेपद आहे. दक्षिण कोरियाकडून मांजे जंग (17व्या मिनिटात) आणि टेल ह्वांग (52व्या मिनिटात) यांनी गोल केला. तर, मलेशियासाठी सय्यद चोलननं 25 व्या मिनिटाला एकमेव गोल केला.


जपानला नमवून भारतानं कांस्यपदक जिंकलं
भारताच्या युवा हॉकी संघानं बुधवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात जपानचा 1-0 असा पराभव करून आशिया चषक स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पहिल्या पाच मिनिटांत अनेक फटके मारून संघाला चांगली सुरुवात केली. परंतु त्यांना डी मध्ये यश आलं नाही. सातव्या मिनिटाला उत्तम सिंहनं उजव्या बाजूनं चेंडू राजकुमारकडे वळवला, ज्यानं जपानी गोलरक्षक ताकाशी योशिकावाला चकवा देत गोल केला. तीन मिनिटांनंतर भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, त्याचा भारतीय संघाला फायदा घेता आला नाही. 


कोरियाविरुद्ध सामना बरोबरीत सुटला
 कोरियाविरुद्ध सामन्यात आठव्या मिनिटाला नीलम संजीपनं भारतासाठी पहिला गोल केला. त्यानंतर कोरियानं दोन गोल केले. त्यानंतर 20व्या मिनिटाला मनिंदर सिंहनं गोल करत स्कोअर बरोबरीत आणला. सेशे गौडाने अल्पावधीतच भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, कोरियाच्या किमनं 27 व्या मिनिटाला गोल करून पुन्हा बरोबरी साधली. तिसर्‍या क्वार्टरमध्ये मारिसवरन शक्तीवेलनं गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जंग मांजेनं पुन्हा गोल करून बरोबरी साधली. चौथ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. 


हे देखील वाचा-