Deepak Chahar: दीर्घकाळाच्या रिलेशनशीपनंतर दीपक चाहर आणि त्याची मैत्रीण जया भारद्वाज यांनी 1 जून 2022 रोजी लग्नगाठ बांधली. फतेहाबाद येथील जेपी पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात दीपक चाहरनं 53 व्या सामन्यानंतर गर्लफ्रेंड जया भारद्वाजला स्टेडियममध्येच प्रपोज केलं. त्या सामन्यानंतर दीपक जयाला प्रपोज करणार नव्हता, पण धोनीच्या (MS Dhoni) सांगण्यावरून त्यानं आपला प्लान बदलला, अशी माहिती दिपक चाहरचे वडील लोकेंद्र सिंह यांनी दिली. 


आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील 53 व्या सामन्यानंतर दिपक चाहरनं स्टॅण्डमध्ये जाऊन गुडघ्यावर बसून जयाला प्रपोज केलं. त्या सामन्यानंतर दीपक जयाला प्रपोज करणार नव्हता, पण धोनीच्या सांगण्यावरून त्यानं आपला प्लान बदलला. याचा खुलासा दीपकचे वडील लोकेंद्र सिंह चाहर यांनी केला. दीपकनं दुसऱ्या दिवशी जयाला प्रपोज करण्याची योजना आखल्याचं सांगितलं, तर धोनीनं या गोष्टीत उशीर करू नको असं दिपकला सांगितलं. त्यानंतर त्यानं त्याच दिवशी जयाला प्रपोज केला. 


व्हिडिओ-



दीपक चाहरचे वडील काय म्हणाले?
लोकेंद्र सिंह चाहर म्हणाले की, "दीपक चाहरनं आयपीएल 2022 च्या प्लऑफ सामन्यात गर्लफ्रेंड जयाला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला होता. दीपकनं हे धोनीला सांगितली. त्यानंतर धोनीनं या गोष्टीत उशीर करू नकोस, लीग सामन्यादरम्यानच जयला प्रपोज करण्याचा सल्ला दिला.त्यानंतर दीपकनं धोनीचं म्हणणे ऐकून ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यानंतर मैदानावर जयाला प्रपोज केलं.


दुखापतीमुळं दीपक चाहरला आयपीएल 2022 मधून पडावं लागलं बाहेर
आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी चेन्नईच्या संघानं दीपक चाहरला रिलीज केलं होते. परंतु, मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर 14 कोटींची बोली लावून त्याला पुन्हा चेन्नईच्या संघात सामील केलं. परंतु, दुखापतीमुळं दीपक चाहरला आयपीएल 2022 मधून बाहेर पडावं लागलं. दरम्यान, पॉवर प्लेमध्ये चेन्नईच्या संघाला दीपक चाहरची कमतरता भासली. 


हे देखील वाचा-