हीनाने 38 गुण कमावून सुवर्णपदकाला गवसणी घातली. यापूर्वी हीना सिद्धूने महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्टल प्रकारातही रविवारी रौप्यपदक पटकावलं होतं.
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत 20 पदकांची कमाई केली आहे. भारताने 11 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदकाची कमाई केली आहे.
21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी
नेमबाजी (महिला - 25 मीटर रॅपिड पिस्टल) हीना सिद्धू सुवर्ण
बॅडमिंटन (मिश्र) सुवर्ण
टेबलटेनिस (पुरुष) सुवर्ण
नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) मेहुली घोष रौप्य
नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) अपूर्वी चंदेला कांस्य
नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) जितू राय सुवर्ण
नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य
वेटलिफ्टिंग (पुरुष - 105 किलो वजनी गट) प्रदीप सिंग रौप्य
टेबल टेनिस (सांघिक) सुवर्ण
नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) मनू भाकेर सुवर्ण
नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) हीना सिद्धू रौप्य
नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर रायफल) रवी कुमार कांस्य
वेटलिफ्टिंग (पुरुष - 94 किलो वजनी गट) विकास थालिया कांस्य
वेटलिफ्टिंग (महिला - 69 किलो वजनी गट) पूनम यादव (222 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (पुरुष - 85 किलो वजनी गट) आर वेंकट राहुल (338 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (पुरुष - 77 किलो वजनी गट) सतीश शिवलिंगम (317 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (महिला - 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (महिला - 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्ण
वेटलिफ्टिंग (पुरुष - 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्य
वेटलिफ्टिंग (पुरुष - 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्य
गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी
भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे.
2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं, 2006... मेलबर्न... 50 पदकं, 2010... दिल्ली... 101 पदकं, 2014... ग्लास्गो... 64 पदकांची लयलूट भारताने केली आहे
संबंधित बातम्या :