मुंबई: हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांना म्हाडानं मोठं गिफ्ट दिलं आहे. कारण लवकरच  1001 घरांसाठी लॉटरी काढणार असल्याचं म्हाडानं जाहीर केलं.


विशेष म्हणजे म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किंमती पाहता घराचं स्वप्न दुरापास्त होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे यंदा म्हाडाच्या लॉटरीत निम्मी घरं अल्प उत्पन्न गटासाठी राखून ठेवण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

यातील बहुतेक घरं ही मुलुंड आणि सायन प्रतीक्षानगर भागात असतील.

विशेष म्हणजे लॉटरी सोहळ्याच्या खर्चात कपात करण्यासाठी वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात मंडप उभारुन लॉटरी योजना जाहीर करण्यात येणार आहे. त्याशिवाय फेसबुकवरही लॉटरीचं थेट प्रक्षेपण करणार असल्याचं म्हाडानं स्पष्ट केलं.

अल्प उत्पन्न गटासाठी घरे  (एकूण घरे -५००)

  • पीएमजीपी मानखुर्द - ११४

  • मुलुंड गव्हाणपाडा- २६९

  • सायन प्रतीक्षानगर- ८४

  • गोरेगाव सिद्धार्थनगर- २४

  • घाटकोपर पंतनगर-२

  • विक्रोळी टागोरनगर- ७


एकूण घरे -५००

अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरे (एकूण- २८३)

  • वडाळा अँटॉप हिल- २७८

  • म्हाडा इमारत घरदुरुस्ती मंडळ- ५

  • एकूण- २८३


मध्यम उत्पन्न गट (एकूण २१६)

  • विक्रोळी कन्नमवार नगर- २८

  • कांदिवली महावीर नगर- १७२

  • मानखुर्द- पीएमजीपी १६


उच्च उत्पन्न गट

घाटकोपर पंतनगर - २

संबंधित बातम्या

म्हाडाला उपरती, यंदा स्वस्त घरांची संख्या जास्त!