शिमला : टीम इंडियाचा विकेटकीपर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी एका कंपनीच्या जाहिरातीचं शुटिंग करण्यासाठी शिमल्यात दाखल झाला आहे. धोनी शिमल्यात दाखल होताच, एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
धोनी खाजगी कंपनीच्या जाहिरातीसाठी आला असताना त्याला सरकारी अतिथीचा दर्जा देण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंह यांनी यावर आक्षेप घेतला.
धोनी पत्नी साक्षीसह शिमल्यात पुढचे पाच दिवस राहणार आहे. हिमाचल प्रदेश सरकारने धोनीला स्टेट गेस्ट म्हणजे सरकारी पाहुण्याचा दर्जा दिलाय. धोनीचा शिमल्यातील सर्व खर्च सरकार करणार आहे. मात्र सरकारी तिजोरीतून खर्च करण्यावर काँग्रेसचा आक्षेप आहे.
एक खेळाडू म्हणून आम्हाला धोनीचा आदर आहे. मात्र स्टेट गेस्टवर होणारा खर्च लोकांच्या करातून आलेल्या पैशातून केला जाणार आहे. त्यामुळे धोनीला स्टेट गेस्टचा दर्जा देण्यात येऊ नये, अशी मागणी काँग्रेसने केली.
दरम्यान, हिमाचल प्रदेशमधील सत्ताधारी भाजपने आपल्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. धोनीची सुरक्षा लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय पर्यटनासाठीही चालना मिळेल. धोनीच नाही, तर प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडूचं याच प्रकारे स्वागत केलं जाईल, असं कॅबिनेट मंत्री विपिन परमार यांनी सांगितलं.
इंग्लंड दौऱ्यानंतर धोनी सध्या फॅमिली टाईम एंजॉय करत आहे. अनेक कार्यक्रमांनाही त्याने हजेरी लावली. तर जाहिरातींचं शुटिंगही तो पूर्ण करत आहे. शिमल्यात पाच दिवसांच्या शुटिंगचं नियोजन आहे.
शिमल्यात धोनीला 'स्टेट गेस्ट'चा दर्जा, काँग्रेसचा आक्षेप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Aug 2018 12:13 PM (IST)
धोनी शिमल्यात दाखल होताच, एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. धोनी खाजगी कंपनीच्या जाहिरातीसाठी आला असताना त्याला सरकारी अतिथीचा दर्जा देण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -