मोदी सरकारच्या काळात जमावाकडून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण वाढल्याचा आरोप आहे. पण आता भाजपने मॉब लिंचिंगकचे जनक हे राजीव गांधी असल्याचं म्हटलं आहे.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
लंडन दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी शीख दंगलीबाबत वक्तव्य केलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 1984 मधील शीखविरोधी हत्याकांडाला अत्यंत वेदनादायी घटना म्हटलं. कोणाही विरोधात कोणतीही हिंसा करणाऱ्यांना 100 टक्के शिक्षा व्हावी. मात्र काँग्रेसचा यामध्ये समावेश नव्हता असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, “माझ्या मनात त्याबाबत कोणताही भ्रम नाही. ती एक वेदनादायी घटना होती. तुम्ही म्हणता त्यामध्ये काँग्रेस पक्ष सहभागी होता, मात्र मी त्याबाबत सहमत नाही. निश्चितच हिंसा झाली होती, निश्चितच ती एक दुर्घटना होती”
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील एका चर्चासत्रात राहुल गांधींना शीख हत्याकांडाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर राहुल गांधी म्हणाले, “जेव्हा मनमोहन सिंह म्हणाले होते, ते आम्हा सर्वांमार्फत बोलत होते. जसं मी यापूर्वीही म्हटलं होतं की मी हिंसा पीडित आहे, त्यामुळे त्याचं दु:ख मला माहित आहे”.
विरोधकांचं टीकास्त्र
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर भाजपसह आम आदमी पार्टी, भाजपचा सहयोगी पक्ष शिरोमणी अकाली दलाने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री आणि अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौल बादल म्हणाल्या, "राहुल गांधी लंडनमध्ये म्हणाले 1984 मधील शीख हत्याकांडात काँग्रेसचा हात नव्हता. जर राहुल गांधींच्याच डोक्याने बोलायचं झालं, तर त्यांचे वडील (राजीव गांधी) आणि आजी (इंदिरा गांधी) यांची हत्या झाली नाही तर त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला"
इंदिरा गांधी आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार