Heinrich Klaasen : विश्वचषक 2023 मध्ये आजमुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध (Eng vs Sa) दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात जमलेल्या हजारो प्रेक्षकांना पर्वण दिली. हेनरिक क्लासेनने 67 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांसह 109 धावा केल्या. या खेळीने चाहत्यांना तर नाचवलेच, पण दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 399 धावांची जोरदार मजल मारली. स्फोटक शतकासह, हेनरिकने स्वतःला विशेष क्लबमध्ये सामील केलं आहे. क्लासेनने अवघ्या 61 चेंडूत शतक झळकावून स्वतःला खास फलंदाजांपैकी एक बनवले.


वाचा : India Vs New Zealand : न्यूझीलंडचा पेपर सोपा नाहीच; रोहित शर्माला गांगुली अन् बुमराहला झहीर खान व्हावं लागेल! 20 वर्षांपूर्वींचा तो पराक्रम माहीत आहे का?


विश्वचषक इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा क्लासेन सहावा फलंदाज


या क्लबमध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज आहेत, ज्यांनी आजपर्यंत विश्वचषक जिंकलेला नाही. 48 वर्षांच्या विश्वचषक इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा क्लासेन आता सहावा फलंदाज ठरला आहे. पहिला क्रमांक दक्षिण आफ्रिकेच्या मार्करामच्या नावावर आहे, ज्याने याच स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध 49 चेंडूत शतक झळकावले होते. तर, आयर्लंडचा केविन ओब्रायन (वि. इंग्लंड, 2011 बेंगळुरूमध्ये 50 चेंडूत) दुसऱ्या स्थानावर आहे.






कर्णधार रोहित आणि कोहली यांच्यासमोर मोठे आव्हान


ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल (2015 मध्ये सिडनीमध्ये श्रीलंकेविरुद्ध 51 चेंडू). दक्षिण आफ्रिकेचा अबेदी व्हिलियर्स (2015 मध्ये सिडनीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 52 चेंडूत) चौथ्या आणि इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन (2019 मध्ये मँचेस्टरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 57 चेंडूत) पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित आणि कोहली यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.






कधीही विश्वचषक जिंकू न शकलेले दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज यादीत 


कधीही विश्वचषक जिंकू न शकलेले दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज वेगवान चेंडूंवर शतके ठोकण्याच्या बाबतीत जगातील अव्वल सहा फलंदाजांमध्ये असताना भारताच्या वीरेंद्र सेहवागपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंतच्या फलंदाजांना यश आलेले नाही, हे आश्चर्यकारक आहे. आता दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी रोहित आणि विराटसह सर्व भारतीय फलंदाजांसमोर आव्हान उभे केले आहे. आता या बाबतीत कोणता भारतीय, कधी आणि किती लवकर पहिल्या पाच-सहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवतो ते पाहू.