मुंबई : झिम्बाब्वेला रवाना झालेल्या भारतीय संघात युवराज सिंहचा समावेश झालेला नाही. त्यामुळे आता रिकाम्या वेळी युवी ट्रेनिंगसोबतच त्याच्या लुक्सवरही लक्ष देत आहे. युवराजने सोशल मीडियावर नवा लूक शेअर केला आहे.

 

 

युवीला त्याचा नवा हेअरकट अतिशय आवडला आहे. नव्या कूल लूकसाठी युवराजने त्याचा हेअर स्टायलिस्ट आलिम हकीमचे आभार मानले आहेत.

 

 

आयपीएल 2016 ची चॅम्पियन टीम ठरलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघात युवराजचा समावेश होता. आयपीएल-9 मध्ये सुरुवातीच्या सामन्यांना मुकल्यानंतर अखेरच्या काही सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती.

 

 

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भलेही युवराज सिंहची निवड झाली नाही, परंतु स्वत:ला फिट ठेवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची आशा त्याने अद्यापही सोडलेली नाही.