मुंबई : भारतीय महिला टी-ट्वेण्टी क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची शैक्षणिक डिग्री वादात सापडली आहे. त्यामुळे पंजाब पोलिसातील डीएसपी पदावरुन तिला हटवलं जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीमध्ये हरमनप्रीत कौरची बीएची डिग्री बोगस असल्याचं आढळून आलं. त्यामुळे पंजाब सरकारने तिला डीएसपी पदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे हरमनप्रीतला याआधी रेल्वेनेही नोकरी दिली होती. पण हरमनप्रीतला पंजाब पोलिसात काम करण्याची इच्छा होती. त्यामुळेच यावर्षीच्या सुरुवातीला तिला रेल्वे सेवेतून मुक्त करण्यात आलं.
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केल्याने हरमनप्रीतला पंजाब पोलिसमध्ये डीएसपी पद देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
हरमनप्रीतची बीएची डिग्री बोगस आढळल्यानंतर आता पोलिसांनी तिला एक पत्र लिहिलं आहे. ‘तुझं शिक्षण 12 वी पर्यंतच झालं आहे, त्यामुळे तुला कॉन्स्टेबलची नोकरी मिळू शकते,’ असं या पत्रात पंजाब पोलिसांनी म्हटलं आहे.
‘पंजाब पोलिसांकडून आम्हाला अजूनपर्यंत कोणतंही अधिकृत पत्र आलेलं नाही’, असं स्पष्टीकरण हरमनप्रीतच्या मॅनेजरने दिलं आहे.
हरमनप्रीत कौरने भारतीय क्रिकेट संघाकडून आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले आहेत. पण तिला कसोटीत फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. मात्र 87 वनडे सामन्यात तिने 35.41 च्या सरासरीने दोन हजार 196 धावा केल्या आहे. तर तिने 83 टी-ट्वेण्टी सामन्यांत 27.86 सरासरीने 1616 धावा केल्या आहेत.
हरमनप्रीत कौरची डिग्री बोगस, डीएसपी पद जाणार ?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2018 05:44 PM (IST)
भारतीय महिला टी-ट्वेण्टी क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची शैक्षणिक डिग्री वादात सापडली आहे. त्यामुळे पंजाब पोलिसातील डीएसपी पदावरुन तिला हटवलं जाण्याची शक्यता आहे.
भारतीय महिला संघ 12 वर्षानंतर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचली असून देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. टीम इंडियाच्या या विजयाची शिल्पकार ठरलेली त हरमनप्रीत कौर ठरली. तिनं 171 धावांची अप्रतिम खेळी साकारली. क्रिकेटमधील दिग्गजांनी देखील हरमनप्रीत कौर आणि टीमचं मनापासून कौतुक केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -