ठाणे: ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार पावसामुळे ठाण्यातले तलाव भरू लागले आहेत. ठाण्याचा मासुंदा तलाव, जेल तलाव, कचराळी तलाव, मखमली तलाव अशा सगळ्याच तलावांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या उन्हाळ्यात याच तलावांची पातळी मोठ्या प्रमाणात घटली होती. ठाणे शहर हे तलावाचं शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र उन्हाळ्यात याच तलावांची झालेली अवस्था पाहून ठाणेकर हळहळले होते. आता मात्र तलावांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
येत्या पाच दिवसात ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून त्यामुळं ठाण्यातले तलाव ओव्हरफ्लो होतील, अशी शक्यता आहे.
ठाण्यातील तलावांची पाणी पातळी वाढली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2018 03:05 PM (IST)
जोरदार पावसामुळे ठाण्यातले तलाव भरू लागले आहेत. ठाण्याचा मासुंदा तलाव, जेल तलाव, कचराळी तलाव, मखमली तलाव अशा सगळ्याच तलावांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -