कथित गर्लफ्रेण्डविषयी हार्दिक पांड्या म्हणतो...
एबीपी माझा वेब टीम | 15 Feb 2017 12:52 PM (IST)
मुंबई : रविंद्र जाडेजा, युवराज सिंह, ईशांत शर्मा हे क्रिकेटर लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर आता अष्टपैलू हार्दिक पांड्या टीम इंडियाचा मोस्ट एलिजेबल बॅचलर लिस्टमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. नुकताच हार्दिक पांड्याचा एका सुपरमॉडेलसोबचा फोटो व्हायरल झाला होता. लिजा शर्मा नावाची ही मॉडेल हार्दिकची गर्लफ्रेण्ड असल्याचं सांगितलं जात आहे. लिजा शर्माचा मूळची जमशेदपूरची आहे. तसंच सोशल मीडियात आणखी फोटोही व्हायरल झाले असून, हार्दिक पांड्या लिजासह हाँगकाँगमध्ये सुट्टी एन्जॉय करत असल्याची चर्चा रंगली होती. व्हॅलेंटाईन डेला हार्दिक पांड्या जगासमोर प्रेमाची जाहीर कबुली देईल, असं म्हटलं जात होतं. पण घडलं नेमकं उलट. सोशल नेटवर्किंग साईटवर हार्दिक पांड्याने पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकारावर स्पष्टीकरण दिलं आहे. ट्विटरवर एक फोटो पोस्ट करुन हार्दिकने लिहिलं आहे की, "मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, मी सिंगल असून माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो निव्वळ अफवा आहेत. यामुळे आमची कठोर मेहनत दिसत नाही. या अफवा थांबवल्या तर मला आनंद होईल." https://twitter.com/hardikpandya7/status/831363518783905797