स्मार्ट बुलेटिन | 20 ऑक्टोबर 2021 | बुधवार | एबीपी माझा
दीड वर्षांनंतर कॉलेज कॅम्पस गजबजणार, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी महाविद्यालयांकडून जय्यत तयारी
मुंबई : कोरोनामुळे राज्यासह देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यामुळे महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महाविद्यालयं आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत. तर, यासोबतच कृषी महाविद्यालयंही आजपासून सुरु होणार आहेत. महाविद्यालयात येण्यासाठी विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं बंधनकारक असणार आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्यासाठीच्या सूचना काल देण्यात आल्यात. दिवाळी काही दिवसांवर आहे. त्यातच पुण्यात बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे आज लगेच पुण्यातील महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता कमी आहे.
आर्यन खानच्या जामीनावर आज फैसला, 17 दिवस कोठडीत काढल्यानंतर सुटका होणार की कारागृहातच मुक्काम वाढणार याकडे लक्ष
Cruise Drugs Case : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या भवितव्याचा फैसला आज ठरणार आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, गेल्या 17 दिवसांपासून आर्यन खान क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर आज सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टानं गेल्या सुनावणीत जामीन अर्जावरील निर्णय सुरक्षित ठेवला होता.
चॅनेल्स पाहण्यासाठी 50 टक्के अधिक खर्च करावा लागणार, 'ट्राय'च्या नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे किंमती वाढणार
कोरोनाविरोधातील लढाईत भारताची मोठी कामगिरी, आज 100 कोटी लसवंतांचा टप्पा पूर्ण होण्याची शक्यता, केंद्र सरकार ऐतिहासिक क्षण साजरा करणार
मुंबईतल्या सायन परिसरातून 21 कोटींचं हेरॉईन जप्त, ड्रग्ज पेडलर महिला गजाआड, मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई
सेक्स टूरिझम रॅकेटचा भंडाफोड; मुंबई क्राइम ब्रांचची कारवाई, दोन महिला अटेकत
नागपुरातील कळमना परिसरात निर्माणधीन फ्लायओव्हरचा गर्डर कोसळला, वाहतूक सुरु नसल्यानं मोठा अनर्थ टळला
काँग्रेसला रामराम ठोकणारे कॅप्टन अमरिंदर सिंह नवीन पक्ष स्थापन करणार, शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याच्या अटीवर भाजपशी हातमिळवणीची शक्यता
अमेरिकेच्या टेक्ससमध्ये टेकऑफ नंतर विमान दुर्घटना, अपघातानंतर लागलेल्या आगीत विमान जळून खाक, सर्व 21 प्रवाशांना वाचवण्यात यश
बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारामागे तालिबान आणि पाकिस्तानचा हात, बांग्लादेशच्या संसदेच्या अध्यक्षांकडून संशय व्यक्त