नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक पंड्याने स्वतःला सिद्ध केलं. त्याने कसोटी कारकीर्दीतलं पहिलंच शतक कॅण्डी कसोटीत पूर्ण केलं.

भारतीय संघापर्यंत पोहोचवण्याबद्दल पंड्याने त्याच्या वडिलांचे आभार मानले आहेत. त्याने वडिलांना सरप्राईज गिफ्ट देऊन कसोटीतील पहिल्या शतकाचा आनंद साजरा केला.

https://twitter.com/hardikpandya7/status/897830868726628352

पंड्याने वडिलांना कार गिफ्ट देत कामगिरीचं सर्व श्रेय त्यांनाच दिलं. तुम्ही ज्या कारजवळ उभे आहात, त्या कारचे मालक तुम्ही आहात, असं हार्दिक पंड्याने ट्वीट केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

वडिलांनी माझ्यासाठी आणि क्रुणलसाठी सर्व काही सोडलं, असं करण्यासाठी मोठी हिंमत लागते. वडिलांनी माझ्यासाठी सर्व काही केलं आहे. त्यांचे मानावे तेवढे आभार कमी, असं पंड्याने म्हटलं आहे.