आधार कार्ड अधिनियमाच्या नियमानुसार हे आधार कार्ड रद्द करण्यात आले आहेत. कागदपत्र, बायोमेट्रिक कारण किंवा एकाच व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक आधार कार्ड असल्यामुळे आधार कार्ड रद्द केले जाऊ शकतात, असं चौधरी यांनी स्पष्ट केलं.
आधार कार्ड रद्द करण्याचे अधिकार UIDAI ला आहेत.
तुमचं आधार कार्ड चालू आहे का?
तुमचं आधार कार्ड चालू आहे की बंद हे तुम्ही UIDAI च्या वेबसाईटवर पाहू शकता. त्यासाठी https://uidai.gov.in या लिंकवर क्लिक करा.
या लिंकवर क्लिक केल्यानंतर UIDAI चं होम पेज येईल. या होम पेजवर 'व्हेरीफाय आधार नंबर' असा पर्याय दिसेल.
'व्हेरीफाय आधार नंबर' यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढील पेजवार जाल. तिथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर पुढील स्टेपमध्ये तुमचं आधार कार्डचं स्टेटस सांगितलं जाईल.
संबंधित बातम्या :