या हाणामारीची सुरुवात पोलीस कॉन्स्टेबलनी सुरु केल्याची माहिती आहे. पण इंगळे यांच्या दाव्यानुसार भदाणे यांनी आधी त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता. पण सीसीटीव्ही दृश्यांमध्ये भदाणे हे आपली गाडी रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न करत होते.
त्याच प्रयत्नात इंगळे यांना गाडीचा धक्का लागला आणि मग इंगळेंनी भदाणे यांच्यावर हात उगारल्याने पुढे हाणामारी सुरु झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान भदाणे यांच्या पत्नी या न्यायाधीश असल्यानेच त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोप होत आहे. तर कॉन्स्टेबल इंगेळ यांनी तक्रारच दिली नसल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यात न्यायाधीशाच्या पतीने चक्क वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पुण्यातील गजबजलेल्या कर्वे रोडवरील स्वातंत्र्य चौकात हा प्रकार घडला. बुधवारी दुपारी बारा-साडेबारा वाजताच्या सुमारास डेक्कन परिसरात श्याम भदाणे नो एन्ट्रीतून दुचाकी घेऊन आले. यावेळी वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र इंगळे यांनी भदाणेंना अडवलं. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, आणि श्याम भदाणेनs रवींद्र इंगळेंना मारहाण केली.
मारहाण करणाऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश होता. तिथून जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात या घटनेचं रेकॉर्डिंग झालं आहे.