मुंबई: टीम इंडियाचा क्रिकेटपटू हरभजन सिंहने जेट एअरवेजच्या पायलटवर वर्णद्वेषाचा आरोप केला आहे. पायलटने विमानप्रवासादरम्यान भारतीय प्रवाशावर वर्णद्वेषी टिपण्णी आणि शिवीगाळ केल्याचा दावा हरभजन सिंहने केला आहे.
इतकंच नाही तर पायलटने सहकारी महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केलंच, शिवाय अपंग प्रवाशाला धक्काबुक्कीही केल्याचं हरभजनने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
त्यामुळे अशा पायलटवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी भज्जीने केली आहे.
काय आहे प्रकरण?
हरभजन सिंह जेट एअरवेजने प्रवास करत होता. त्यावेळी त्याचा सहकारी प्रवासीही भारतीयच होता. मात्र या सहकारी प्रवाशासोबत पायलटचा काही वाद झाला.
त्यावेळी पायलटने भारतीय प्रवाशाकडे पाहून वर्णद्वेषी टिपण्णी आणि शिवीगाळ केली, असं हरभजनने म्हटलं आहे.
पायलटने केवळ शिवीगाळच केली नाही तर प्रवासी महिलेशी गैरवर्तन केलं. तसंच एका अपंग पुरुष प्रवाशाला धक्काबुक्की केली, असाही आरोप हरभजनने केला आहे.
भारतात येऊन पैसे कमावता आणि भारतीयांनाच वर्णद्वेषी टिपण्णी करतो, असं म्हणत हरभजनने पायलटवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
https://twitter.com/harbhajan_singh/status/857135699308539905
https://twitter.com/harbhajan_singh/status/857136719216431108
https://twitter.com/harbhajan_singh/status/857137230661529601