VIDEO: चित्त्यासारखी झेप... महिला क्रिकेटरनं टिपला अप्रतिम झेल!
एबीपी माझा वेब टीम | 03 Jan 2017 12:39 PM (IST)
सिडनी: ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये महिला क्रिकेट संघाचेही सामने सुरु आहेत. टी-20 सामन्यात महिलाही पुरुषांपेक्षा काही कमी नाहीत. याच लीगमध्ये एका महिल क्रिकेटरने पकडलेला हा कॅच सध्या बराच व्हायरल होत आहे. ब्रिस्बेन हीट्स संघाची ऑल राऊंडर हेडी बिरकेटनं सिडनी थंडर्सविरुद्ध एक असा झेल घेतला की, ज्यानं सर्वच जण थक्क झाले. ब्रिस्बेन हीट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. क्षेत्ररक्षण करताना हेडी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभी असताना सिडनी थंडर्सच्या नाओमीचा अक्षरश: झेप घेऊन एक शानदार झेल घेतला. दरम्यान, ब्रिस्बेनला हा सामना गमवावा लागला. पण हेडीच्या या कॅचनं सर्वाचं हृदय जिंकलं. VIDEO: