नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात बॉलिवूडचाही रंग दिसणार आहे. अभिनेता अजय देवगनसोबत 'अॅक्शन-जॅक्सन' सिनेमात काम केलेली अभिनेत्री मनस्वी ममगई या सोहळ्यात एक डान्स परफॉर्मन्स करणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. मनस्वी भारताची रिपब्लीकन हिंदू कोएलिशन अॅम्बेसेडर असून ट्रम्प देखील रिपब्लीकन पक्षाचे आहेत. त्यामुळे मनस्वी या सोहळ्यात सहभागी होणार असून यामध्ये इतरही बॉलिवूडचे कलाकार असण्याची शक्यता आहे.
ट्रम्प भारतासाठी अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात चांगले राष्ट्राध्यक्ष असतील. कारण त्यांनी आतापर्यंत भारताला नेहमीच पाठिंबा दिलाय, असं मनस्वीने म्हटलंय.