नवी दिल्लीः झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या वन डे मध्ये गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केलं. कर्णधार धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी हा निर्णय योग्य असल्याचं दाखवून दिलं. ज्यामुळे गोलंदाजांनी एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या 5 फलंदाजांना आऊट करत 30 ओव्हरमध्ये केवळ 91 धावा दिल्या. ही गोलंदाजी गेल्या 10 वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आहे. भारतीय गोलंदाज गेल्या 10 वर्षात 30 ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाला 100 पेक्षा कमी धावांत रोखू शकले नव्हते. मात्र या युवा खेळाडूंनी हा अनोखा रेकॉर्ड केला आहे.
भारताला पहिली विकेट बरींदर सरनने मिळवून दिली. तर धवल कुलकर्णी एक आणि जसप्रित बुमराहने दोन विकेट घेतल्या.