मुंबई : मी मुख्यमंत्रिपदाची दावेदार नाही. मात्र, पक्षाकडून कधी मुख्यमंत्रिपदासाठी विचारणा झाल्या, पक्षाचा आदेश डावलणार नाही, असे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
"वादांपेक्षा मी कामाला अधिक महत्त्व देते. माझ्यावरील चिक्की घोटाळ्याचा आरोपही खेटा ठरला. एकनाथ खडसेंवरील आरोपांमध्ये तथ्य नाही. ते निर्दोष सिद्ध होऊन पुन्हा काम सुरु करतील." असे यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
माझा कट्टावरील पंकजा मुंडे यांचे महत्त्वाचे मुद्दे-
- वादांपेक्षा कमांना महत्त्व देते - पंकजा मुंडे
- पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी विचारल्यास, पक्षाचा आदेश डावलणार नाही - पंकजा मुंडे
- मी मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार नाही - पंकजा मुंडे
- बहुजनांवर आरोप होतात, हे नारायण राणेंचे मत चूक - पंकजा मुंडे
- जनतेला त्यांच्या पायावर उभं करण्याकडे आमचं लक्ष - पंकजा मुंडे
- भाजपमध्ये बहुजन नेत्यांची मोठी फळी - पंकजा मुंडे
- चिक्की घोटाळ्याचा आरोप खोटा ठरला - पंकजा मुंडे
- गोपीनाथ मुंडेंनी भाजपशिवाय दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा विचार केला नव्हता - पंकजा मुंडे
- 24 तासांमधील 17 तास मी काम करते - पंकजा मुंडे
- जलयुक्त शिवारावरुन मुख्यमंत्री आणि माझ्यात कुठलाही श्रेयवाद नाही - पंकजा मुंडे
- दुष्काळाचे आभार, दुष्काळ आला नसता, तर काम करण्याची संधी मिळाली नसती - पंकजा मुंडे
- शिवसेना-भाजपमध्ये मतभेद आहे, मात्र मनभेद नाहीत - पंकजा मुंडे
- धनगर समाजाला आरक्षण मिळायला हवं - पंकजा मुंडे
- विनायक मेटेंशी कसलाही वाद नाही, ते माझे सहकारी आहेत - पंकजा मुंडे
- मी मंत्री आहे, तर मेटे यांचा छोटा पक्ष आमच्यासोबत, त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहावंच, असं काही नाही - पंकजा मुंडे