रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी एक चौकार अडवण्याच्या प्रयत्नात विराटचा उजवा खांदा दुखावला होता. त्या वेळी वेदनांनी कळवळणाऱ्या भारतीय कर्णधारानं डाव्या हातानं आपला उजवा खांदा दाबून धरला होता. विराटच्या विकेटचं सेलिब्रेशन करताना मॅक्सवेलनं भारतीय कर्णधाराच्या त्याच कृतीची नक्कल केली.
दरम्यान, रांची कसोटीचा तिसरा दिवस हा टीम इंडियाचा शतकवीर चेतेश्वर पुजाराचा ठरला. पुजारानं कसोटी कारकीर्दीतलं अकरावं शतक झळकावलंच, पण अख्खा दिवस एक खिंड थोपवून ऑस्ट्रेलियाला या कसोटीवर पकड घेऊ दिलेली नाही. या कसोटीत भारतानं तिसऱ्या दिवसअखेर सहा बाद 360 धावांची मजल मारली असून, पहिल्या डावातल्या आघाडीसाठी टीम इंडियाला अजूनही 92 धावांची आवश्यकता आहे.
भारतीय संघाच्या दृष्टीनं समाधानाची बाब म्हणजे झुंजार शतकवीर चेतेश्वर पुजारा अजूनही मैदानात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी पुजारा 130, तर रिद्धिमान साहा 18 धावांवर खेळत होता. पुजारानं 328 चेंडूंमधली नाबाद 130 धावांची खेळी 17 चौकारांनी सजवली. पुजारानं मुरली विजयच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची, तर अजिंक्य रहाणेच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी रचली. या दोन भागिदाऱ्यांनी भारतीय डावाला आकार दिला.
पाहा व्हिडीओ -