मुंबई: मुंबईतल्या राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षाचं उद्घाटन झाल्यानंतर आज मुंबईकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.


31 मार्चपर्यंत पेंग्विन पाहण्यासाठी कुठलीची फी घेतली जाणार नाही. त्यामुळं सध्या लोक सहपरिवार पेंग्विन पाहण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. भर उन्हातही पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांनी रांगा लावल्या होत्या.

दरम्यान काही दिवसातच यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर येथील शुल्क वाढीचा प्रस्तावही देण्या आल्या आहेत. त्यामुळे पेंग्विन पाहण्यासाठी किमान 100 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. मात्र, या शुल्कवाढीबाबत अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.