नवी दिल्ली : दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या यंदाच्या आयपीएल मोसमातल्या निराशाजनक कामगिरीला कंटाळून गौतम गंभीर कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे. इतकंच नव्हे तर गंभीरनं त्याच्या दोन कोटी 80 लाख रुपयांच्या मानधनावरही पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या मोसमात गौतम गंभीर एक नवा पैसाही न घेता दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळणार आहे. दरम्यान, गौतम गंभीरऐवजी दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा मुंबईच्या श्रेयस अय्यरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
दिल्लीने 6 पैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. दिल्लीने मुंबई इंडियन्सचा पराभव करुन या विजयाची नोंद केली. याशिवाय गंभीरचा फॉर्मही कर्णधारपदाला साजेशा नाही. गंभीरने 6 सामन्यात केवळ 85 धावाच केल्या आहेत.
गंभीर सात वर्षांनी पुन्हा स्वगृही म्हणजेच दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या संघात परतला होता. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपद भूषवत होतं. गंभीरच्या नेतृत्त्वात कोलकाताने दोनवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. मात्र गंभीरला तोच फॉर्म दिल्ली संघासोबत कायम राखता आला नाही.
IPL 2018 : गंभीरने आधी कर्णधारपद सोडलं, आता मानधनही नाकारलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Apr 2018 10:01 PM (IST)
दिल्लीने 6 पैकी केवळ एकचा सामना जिंकला आहे. दिल्लीने मुंबई इंडियन्सचा पराभव करुन या विजयाची नोंद केली. याशिवाय गंभीरचा फॉर्मही कर्णधारपदाला साजेशा नाही. गंभीरने 6 सामन्यात केवळ 85 धावाच केल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -