Gautam Gambhir : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यापासून कोणतीच समाधानकारक कामगिरी होत नसल्याने टीकाकारांचे धनी झालेल्या गौतग गंभीर यांच्यावर आता आणखी एक गंभीर आरोप झाला आहे. माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने गौतम गंभीर यांना ढोंगी म्हटले आहे. इतकंच नाही तर मनोजने गौतम यांना श्रेय घेणारा एकटा असल्याचंही म्हटलं आहे.
गंभीरने केकेआरसाठी एकट्याने विजेतेपद पटकावले नाही
39 वर्षीय मनोज तिवारीने सांगितले की, 'गंभीरने केकेआरसाठी एकट्याने विजेतेपद पटकावले नाही, कारण आम्ही सर्वांनी एक टीम म्हणून कामगिरी केली. कॅलिस, नरिन आणि मी सर्वांनी त्यात योगदान दिले. पण याचे श्रेय कोणी घेतले? आणि पी.आर. जे त्याला सर्व श्रेय घेण्यास अनुमती देते. तिवारी हा 2012 आणि 2014 मध्ये गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएल जिंकणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा भाग होता.
मनोज तिवारी काय म्हणाला?
गौतम गंभीर ढोंगी आहे. ते जे बोलतात ते करत नाहीत. कर्णधार (रोहित) कुठला आहे? मुंबईचा आहे. अभिषेक नायर कुठून आला? मुंबईचे आहेत. त्याला मुंबईच्या खेळाडूला पुढे आणण्याची संधी मिळाली. जलज सक्सेनासाठी बोलणारे कोणी नाही. तो चांगले प्रदर्शन करतो, परंतु शांत राहतो. गोलंदाजी प्रशिक्षकाचा उपयोग काय? प्रशिक्षक काहीही म्हणतील, तो मान्य करेल. मॉर्ने मॉर्केल लखनौ सुपरजायंट्सकडून आला. अभिषेक नायर गंभीरसोबत केकेआरमध्ये होता. मुख्य प्रशिक्षकाला माहित आहे की ते त्याच्या निर्देशांविरुद्ध जाणार नाहीत.
गौतम गंभीरच्या मनोज तिवारीच्या तुलनेत दुप्पट धावा
दुसरीकडे, 2012 च्या मोसमात कर्णधार गौतम गंभीरने मनोज तिवारीपेक्षा दुप्पट धावा केल्या होत्या. गंभीरने 17 सामन्यात 590 धावा केल्या होत्या, तर मनोज तिवारीने 16 सामन्यात 260 धावा केल्या होत्या.
नितीश राणाचे ट्विटरवर प्रत्युत्तर
मनोज तिवारीच्या वक्तव्यानंतर नितीश राणाने सोशल प्लॅटफॉर्म X वर प्रत्युत्तर दिले. राणाने लिहिले की, 'टीका ही वस्तुस्थितीवर आधारित असली पाहिजे, वैयक्तिक असुरक्षिततेवर नाही. गौती भैया हा मी आजवर भेटलेल्या निस्वार्थी खेळाडूंपैकी एक आहे. संकटाच्या वेळी ते इतर कोणाच्या प्रमाणे जबाबदारी घेतात. कोणत्याही पीआरची आवश्यकता नाही. ट्रॉफी स्वतःच बोलतात.
इतर महत्वाच्या बातम्या