'दंगल'मधील जायराच्या अभिनयाला मुस्लीमविरोधी ठरवणं आणि मेहबुबा मुफ्तींच्या भेटीवरुन राजकारण करणं हे चुकीचं आहे. शिवाय तिला याबद्दल माफी मागावी लागते, हे सुद्धा लाजिरवाणं आहे, असं ट्वीट गंभीरने केलं आहे.
https://twitter.com/GautamGambhir/status/821208726270902272
जायराच्या प्रकरणात स्त्री-पुरुष भेद स्पष्ट जाणवतोय. कुणी आमीर खान, शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या बाबतीत अशी हिंम्मत करु शकतं का, असा सवालही गंभीरने केला आहे.
https://twitter.com/GautamGambhir/status/821210227043274754
पुरुष हे पुरुष असतात. जायरासारखी मुलगी पुढे जात असल्याचं पाहून काही जणांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे 'म्हारी छोरियां आज भी छोरों से कम हैं', असं दुर्दैवाने म्हणावं लागत आहे, असंही गंभीरने ट्वीट केलं आहे.
https://twitter.com/GautamGambhir/status/821211062984814593
गंभीर अगोदर पैलवान गीता फोगाटनेही जायराचं समर्थन केलं होतं. ती धाकड गर्ल आहे, त्यामुळे तिला माफी मागण्याची गरज नाही, असं गीता म्हणाली होती.