फोनवर झालेल्या चर्चेनंतर उद्धव आणि मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर जागा वाटपासंदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून खलबतं सुरूच राहणार आहे.
दरम्यान, निवडणुकीची घोषणा झाल्यापासून भाजप आणि शिवसेना नेते पारदर्शकतेच्या अजेंड्यावरू एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. दुसरीकडे आज होणारी भाजप-शिवसेनेतील बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे आता युतीसाठीची बैठक उद्या दुपारी १ वाजता बी-७ या शासकीय निवासस्थानी होणार आहे.
संबंधित बातम्या:
शिवसेना-भाजपमधील आज होणारी बैठक रद्द
राज्य आणि केंद्रातही पारदर्शकता हवी : शिवसेना