French Open 2022: भारताचा रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) आणि त्याचा जोडीदार एम मिडेलकूपनं (Matwe Middelkoop) गेल्या सात वर्षांतील पहिली ग्रँड स्लॅम उपांत्य फेरी गाठली. फ्रेंच ओपन पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत (Men's Doubles Quarterfinals) त्यांनी लॉयड ग्लासपूल  (Lloyd Glasspool) आणि हेन्री हेलिओव्हारा (Henri Heliovaara) यांचा पराभव केलाय. 


ट्वीट-



बोपन्ना आणि मिडलकूप जोडीची चमकदार कामगिरी
बोपन्ना आणि मिडलकूप जोडीने ब्रिटनच्या ग्लासपूल आणि फिनलंडच्या हेलिओवराचा 4-6, 6-4, 7-6 असा फरकानं पराभूव केला. बोपन्ना आणि मिडलकूपनं पहिला सेट गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत दोन्ही सेट जिंकले.त्यांनी शनिवारी विम्बल्डन चॅम्पियन जोडी मेट पेविच आणि निकोला मेक्टिक यांचा पराभव केला. बोपन्नानं यापूर्वी 2015 विम्बल्डनमध्ये रोमानियाच्या फ्लोरिन मेर्जियासह उपांत्य फेरी गाठली होती, जिथे त्याला जीन-ज्युलियन रॉजर आणि होरिया टेकाऊ यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.


पुढचा सामना कोणाशी?
दरम्यान, 42 वर्षीय बोपन्ना आणि 38 वर्षीय मिडेलकूप आता 12व्या मानांकित मार्सेलो अरेव्हालो आणि जीन-ज्युलियन रॉजर यांच्याशी खेळतील. या सामन्यात बोपन्ना आणि त्याचा जोडीदार एम मिडेलकूप कशी कामगिरी बजावतात? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


रोहन बोपन्नाची कामगिरी
2017 मध्ये रोहन बोपन्नानं गॅब्रिएलासोबत मिश्र दुहेरीत विजेतेपद पटकावलं. याशिवाय 2018 मध्ये त्यानं ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली होती. त्याचप्रमाणे तो 2015 च्या यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचला. बोपन्नानं 2013 आणि 2015 मध्ये विम्बल्डनच्या दुहेरीतही उपांत्य फेरी गाठली होती. 2010 मध्ये तो यूएस ओपनचा उपविजेता होता.


हे देखील वाचा-