अख्तरने सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक लहान मुलगी आहे जिच्या एका डोळ्यावर जखमेची पट्टी बांधण्यात आली आहे. या फोटोवर मजकूर लिहिण्यात आला आहे की, तुम्ही त्यागाची व्याख्या जगासमोर मांडली आहे. आम्ही तुमच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करत आहोत.
जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक म्हणजे कलम 370 रद्द करणारे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झाल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बैठकांवर बैठका घेत आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांची नॅशनल सिक्युरिटी कमिटीसोबत बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राजनैतिक संबंधांचा दर्जा घटवणार असल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे. याशिवाय पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना भारतात पाठवणार असल्याचंही म्हटलं. तसेच दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनाही परत बोलावण्याच्या निर्णय घेतला आहे.
सानिया-शोएबच्या बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळणार?
मोदी सरकारने कलम 370 रद्द करुन जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केलं आहे. यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे. तसेच जम्मू-काश्मीरला असलेल्या विशेष राज्याचा दर्जाही संपला आहे.