मुंबई : टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने आगामी वर्ल्ड कपसाठी त्याची ड्रीम टीम जाहीर केली आहे. सेहवागने त्याच्या ट्विटर, इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत त्याच्या टीमची घोषणा केली आहे. तसेच वर्ल्ड कपसाठी तुमची टीम कोणती असेल, असंही सेहवागने सर्वांचा विचारलं आहे.
सेहवागने शेअर केलेल्या पोस्टमध्ये 2015 ची वर्ल्ड कपची भारतीय टीम आणि 2019 ची टीम दाखवली आहे. 2015 ला वर्ल्ड कप खेळलेल्या 8 खेळाडूंना सेहवागने त्याच्या टीममध्ये स्थान दिलेलं नाही.
विशेष म्हणजे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला सेहवाने आपल्या संघातून वगळलं आहे. सध्या आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करत असलेल्या अंबाती रायुडूलाही सेहवागने त्याच्या संघात जागा दिलेली नाही. सध्या रायुडूला संघात चार नंबरवर खेळणारा अव्वल खेळाडू मानलं जातं. रायुडूसोबत आर अश्विनलाही सेहवागने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
विजय शंकर, केएल राहुल, रिषभ पंत या नव्या दमाच्या खेळाडूंना सेहवागने त्यांच्या संघात संधी दिली आहे. हे सर्व खेळाडू आयपीएलमध्ये आपली कमाल दाखवत आहेत. त्यामुळे वर्ल्ड कपमध्येही हे सर्वजण छाप पाडतील, असा विश्वास सेहवागला आहे. गेल्या वर्ल्ड कपमध्ये संघात असलेल्या स्टुअर्ट बिन्नी, उमेश यादव, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, सुरेश रैना यांना सेहवागने आपल्या टीममधून वगळलं आहे.
सेहवागने विश्वास दाखवलेल्या खेळाडूंवर बीसीसीआय विश्वास दाखवणार का? तसेच बीबीसीआय आणि सेहवागच्या टीममधील खेळाडूंमध्ये किती साम्य असेल, हे येत्या 15 एप्रिलला वर्ल्ड कपसाठीच्या टीम इंडियाची घोषणा झाल्यावर स्पष्ट होईल.
वीरेंद्र सेहवागची वर्ल कपसाठीची टीम
- विराट कोहली
- रोहित शर्मा
- शिखर धवन
- महेंद्रसिंह धोनी
- रविंद्र जाडेजा
- भुवनेश्वर कुमार
- मोहम्मद शमी
- केदार जाधव
- केएल राहुल
- हार्दिक पंड्या
- कुलदीप यादव
- युजवेंद्र चहल
- विजय शंकर
- जसप्रीत बुमराह
- रिषभ पंत
VIDEO | मनसेच्या सभांचा खर्च कुणाच्या खात्यातून? | माझा विशेष