नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी  हॉकीपटू उस्मान खान यांचे शुक्रवारी कर्करोगामुळे निधन झाले. ते 76 वर्षाचे होते. गेले काही दिवस ते कर्करोगाशी झुंज देत होते, अखेर ती अपयशी ठरली. उस्मान खान यांच्या मागे तीन मुले आण एक मुलगी असा परिवार आहे. निधनाची बातमी समजल्यानंतर हॉकी इंडियाने श्रद्धाजंली वाहिली. 

हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोम्बाम म्हणाले, "माजी  हॉकीपटू उस्मान खान यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर दु:खी झालो.  क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल ते नेहमीच लक्षात राहतील. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो."

 उस्मान खान गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होते. अखेर आंध्र प्रदेशातील मदनापाले येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला