5) हरमीत सिंग
आयपीएलचा दुसरा चषक अडम गिलख्रिस्टच्या डेक्कन चार्जर्सने जिंकला होता. त्यावेळी गिलख्रिस्टच्या संघात असलेल्या हरमीत सिंगने गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सध्या हरमीत सिंग हा स्थानिक क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळतो.
4) मनविंदर बिस्ला
मनविंदर बिस्ला हा आपल्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध होता. आयपीएलच्या 2012 मधील धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या फायनलमध्ये त्याने 89 धावा ठोकल्या होत्या. बिस्लाच्या याच खेळीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने पहिला आयपीएलचा चषक जिंकला होता.
बिस्ला 2016 मध्ये ढाका प्रिमियर डिव्हिजन क्रिकेटमध्ये खेळला होता.
3) पॉल वल्थाटी
आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज फलंदाज अशी पॉल वल्थाटीची ओळख. 2011 मध्ये सर्वाधिक धावा ठोकणाऱ्यांच्या यादीत वल्थाटी सहाव्या क्रमांकावर होता. त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शतकही ठोकलं होतं.
वल्थाटी शेवटचा स्पर्धात्मक क्रिकेट सामना 2013 मध्ये खेळला आहे.
2) मनप्रीत गोनी
आयपीएलमुळे मनप्रीत गोनी हा जगासमोर आलेला वेगवान गोलंदाज. गोनी हा धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जच्या विजयी संघात होता.
सध्या तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळतो, तर आयपीएलमध्ये गुजरात लायन्सच्या संघात आहे.
1) स्वप्नील असनोडकर
आयपीएलचा पहिला चषक 2008 मध्ये शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल्स संघाने जिंकला होता. या संघात सलामीवीर स्वप्नील असनोडकर महत्त्वाचा खेळाडू होता. असनोडकरच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने अनेक सामने जिंकले होते.
असनोडकर सध्या गोव्याकडून स्थानिक क्रिकेट खेळतो.