2016मधील फोर्ब्स इंडियाची सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींची यादी जाहीर
फोर्ब्स इंडिया मॅगेझिनने 2016 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींची टॉप 100 जणांची यादी जाहीर केली असून, यामध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. कारण कमाईमध्ये नेहमीच एकमेकांना आव्हान देणाऱ्या अभिनेत्यांमध्ये या स्पर्धेत मोठी रस्सीखेच दिसून येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या कमाईची आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे टॉप दहाच्या यादीत त्याचे स्थान कितवे आहे, याचा आंदाज कोणालाही बांधता आलेला नाही.
रणवीरने 67.42 कोटींची कमाई करुन नववे स्थान गाठले आहे.
तर दीपिका पदुकोणला आठव्या स्थानी समाधान मानावे लागले असून, तिने वर्षभरात 69.75 कोटी रुपयांची कमाई केली.
फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी अभिनेत्रींमध्येही मोठी चढाओढ पाहायला मिळाली. कारण प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांच्यामधील या स्पर्धेत प्रियंकाने बाजी मारत सातवे स्थान गाठले. तिने वर्षभरात 76 कोटी रुपये कमावले आहेत.
सहाव्या स्थानी हृतिक रोशनला समाधान मानावं लागलं आहे. त्याने वर्षभरात 90 कोटीचीच कमाई केली आहे.
तर महेंद्र सिंह धोनीने वर्षभरात 122.48 कोटीची कमाई केली असून धोनीला पाचव्या स्थानी समाधान मानावं लागलं.
क्रीडा क्षेत्रातही मोठे फेरबदल झाल्याचे पाहायला मिळत असून, टीम इंडियाचा एकदिवसीय क्रिकेटचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला मागे टाकून कसोटी कर्णधार विराट कोहलीने चौथे स्थान गाठले. कोहलीने 2016 मध्ये 134.44 कोटींची कमाई केली.
तिसऱ्या स्थानी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा नंबर असून, अक्षयने वर्षभरात 203.03 कोटीची कमाई केली.
तर शाहरुखने या वर्षभरात 221.75 कोटींची कमाई केली असून, त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
या यादीत बॉलिवूडचा दबंग खान सलमानने शाहरुखला मागे टाकून अव्वल स्थान गाठले असून, सलमानने या वर्षभरात 270.33 कोटी रुपयाची कमाई केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -