2016 मध्ये या सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्याची एंट्री
एबीपी माझा वेब टीम | 25 Dec 2016 03:07 PM (IST)
1
2016 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजे 20 डिसेंबरला अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी नव्या पाहुण्याची एंट्री झाली. त्यांच्यासोबतच या वर्षात इतर सेलिब्रिटींच्या घरातही पाळणा हलला.
2
अभिनेता आणि अँकर मनिष पॉल दुसऱ्यांदा पिता बनला. मनिषची पत्नी संयुक्ताने यावर्षी मुलाला जन्म दिला.
3
अभिनेत्री श्वेता तिवारीने 27 नोव्हेंबर रोजी मुलाला जन्म दिला.
4
अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता खानने यावर्षी मुलाला जन्म दिला.
5
अभिनेता तुषार कपूरही यावर्षी सरोगसीच्या माध्यमातून पिता बनला.
6
क्रिकेटर हरभजन सिंह आणि गीता बसरा यांच्या घरीही गोंडस मुलीने जन्म घेतला.
7
बॉलिवूडची फेव्हरेट जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनाही यावर्षी पुत्ररत्न झाला.
8
अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने 26 ऑगस्ट रोजी मुलीला जन्म दिला.