मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज गौतम गंभीर मैदानावर असताना खूपच 'गंभीर' दिसतो. फंलदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण गंभीर कायमच धीरगंभीर असल्याचं दिसतं.

अनेकदा तर तो मैदानावरच प्रतिस्पर्धी खेळाडूंशी भिडल्याचंही पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अनेक प्रतिस्पर्धी गंभीरपासून दोन हात दूरच राहणं पसंत करतात. मात्र, असं असलं तरी गंभीर वैयक्तिक आयुष्यात खूपच संवेदनशील आहे. तसंच मैदानाबाहेर तो बरीच मजा-मस्ती करतो.

नुकतंच निवेदक गौरव कपूरनं गौतम गंभीरचा एक फोटो ट्वीरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये गौतम गंभीर चक्क लहान मुलांच्या घसरगुंडीवर खेळताना दिसतो आहे. त्यावरुन गंभीर कसा आहे याचा अंदाज लावता येईल.


'गंभीर कायम 'गंभीर' असतो असं ज्यांना वाटतं त्यांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. धमाल...' असं ट्वीट करत गौरव कपूरनं हा फोटो शेअर केला.

त्यामुळे गंभीर मैदानाबाहेर बरीच मजा मस्ती करत असल्याचं दिसून येतं.