त्याचं झालं असं की, या सामन्यात नेमका टॉसबाबतच घोळ झाला. टॉससाठी जेव्हा श्रीलंकेचा कर्णधार उपुल थरंगानं नाणं वर उडवलं त्यावेळी कर्णधार कोहलीनं 'हेड्स' असा आवाज दिला. नाणेफेकीचा कौल कुणाला हे पाहण्यासाठी मॅच रेफ्री अँडी पाईक्राफ्ट जवळ गेले आणि त्यांनी 'हेड्स इंडिया' असं सांगून थरंगाकडे हातानं खूण केली आणि त्यावेळी मुरली कार्तिकनं विराट कोहलीनं टॉस जिंकल्याचं घोषित केलं. मात्र, रेफ्री पाईक्राफ्ट काही क्षण हे थोडेसे गोंधळलेले दिसले. त्यामुळे सोशल मीडियात याची जोरदार चर्चा झाली की, टॉस श्रीलंकेनं जिंकला की भारतानं?
त्यानंतर विराटनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 170 धावा केल्या. मात्र, तरीही भारतीय संघानं 7 विकेट आणि 4 चेंडू शिल्लक ठेऊन सामना आरामात जिंकला.
VIDEO :