EURO 2024: यूरो कपची रंगत आता वाढू लागली आहे. यूरो कपमध्ये एकूण 24 संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक गटात 4 संघ या प्रमाणं 6 गटांमध्ये त्यांची विभागणी करण्यात आली आहे. जर्मनीत खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत रोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. यावेळी 24 संघांनी युरो कप 2024 मध्ये भाग घेतला आहे. आज जॉर्जिया आणि पोर्तुगाल यांच्यात युरो कपचा 35 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात जॉर्जियाने पोर्तुगालला 2-0 ने पराभूत केले. जॉर्जियाने या विजयासह अंतिम-16 मध्ये प्रवेश केला आहे.
जॉर्जियाचा विजय ऐतिहासिक आहे, 1991 मध्ये सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची त्यांची सर्वात मोठी उपलब्धी आहे. जागतिक क्रमवारीत 74व्या क्रमांकावर असलेल्या जॉर्जियाने सहाव्या क्रमांकाच्या पोर्तुगालवर मात केली. जॉर्जियाचा इथपर्यंतचा प्रवास खडतर होता, कारण ते त्यांच्या पात्रता फेरीत चौथ्या स्थानावर होते. मात्र आज पोर्तुगालविरुद्ध विजय मिळवत जॉर्जियाने इतिहास रचला आहे. जॉर्जियाने गट एफमध्ये आता तिसरे स्थान पटकावले आहे. जॉर्जियाचा अंतिम-16 मध्ये पुढील सामना तीन वेळा युरो जेतेपद जिंकणाऱ्या स्पेनसोबत होणार आहे.
ग्रुप डी मध्ये ऑस्ट्रिया अव्वलस्थानी
ग्रुप डी मध्ये ऑस्ट्रिया, फ्रान्स, नेदरलँडस, पोलंड या संघांचा समावेश आहे. ऑस्ट्रियानं नेदरलँडसला 3-2 गोलनं पराभूत केलं. यासह ऑस्ट्रियानं फ्रान्सला ग्रुप डी मध्ये पिछाडीवर टाकलं आहे. ऑस्ट्रियाकडे आता 6 गुण आहेत. तर, फ्रान्सकडे 5, तर नेदरलँडकडे 4 आणि पोलंडकडे 1 गुण आहे. ऑस्ट्रियानं दोन मॅच जिंकल्या आहेत. तर, फ्रान्सनं एक मॅच जिंकली तर त्यांच्या दोन मॅच ड्रॉ झाल्या. ऑस्ट्रिया ग्रुप डी मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचलं आहे. आता त्यांची लढत ग्रुप एफ मधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघासोबत होईल. ग्रुप एफमधून तुर्की, जॉर्जिया आणि झेक रिपब्लिक या पैकी एखादा संघ ग्रुप एफमध्ये दुसऱ्या स्थानी असेल.
संबंधित बातम्या :
EURO 2024 : पोर्तुगालचा झेक रिपब्लिकवर 2-1 नं नाट्यमय विजय,रोनाल्डोनं किती गोल केले?