Fifa World cup final 2022:  संपूर्णपणे मेसीमय झालेल्या कतारच्या लुसेल स्डेटियमवर इतिहास घडलाय. कारण, तब्बल 36 वर्षांनंतर अर्जेंटिनानं फिफा विश्वचषकावर नाव कोरलंय. 90 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांनी दोन-दोन गोल केले. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळात गेला. त्यात मेसीच्या जादुई गोलच्या जोरावर अर्जेंटिनानं तगड्या फ्रान्सला 3-2 अशा गोलफरकानं मागे टाकलं. पण, 118 मिनिटाला किलियन एम्बापे नावाचं वादळं पुन्हा धडकलं. आणि फ्रान्सनं तिसरा गोल डागला. त्यामुळे निर्धारित वेळ संपली आणि सामना पेनेल्टी शूटआऊटवर गेला. 


आणि त्याच पेनेल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशा फरकानं आर्जेंटिनानं फ्रान्सवर विजय मिळवला. त्यात फ्रान्सकडून किलियन एम्बापेनं पहिला गोल केला. फ्रान्सला आघाडीवर नेल. पण त्यानंतर फ्रान्सच्या दोन खेळाडूंना गोल करता आला नाही. दुसरीकडे मेसीसेनेनं सलग तीन गोल केले होते. आणि पेनेल्टी शूटआऊटवर आपला ताबा मिळवला होता. चौथी किक फ्रान्सच्या रान्डाल कोलो माओनीनं मारली, गोलही केला. त्यानंतर अर्जेंटिनाच्या गोन्झालो मॉन्टिएलनं गोल केला आणि विश्वचषकावर नाव कोरलं. 


सामन्याच्या 23 व्या मिनिटाला मेसीने पेनल्टीवर करत संघाचं खातं उघडलं.. त्यानंतर अर्जेंटिनाचा आक्रमक खेळ सुरू केला. आणि ३६ व्या मिनिटाला मेसीच्याच पासनंतर अर्जेंटिनाच्या एंजल दी मारियाने मिनिटाला सामन्यातील दुसरा गोल केला. आणि पहिल्या हाफमध्ये संघाला भक्कम अशी २-० आघाडी मिळवून दिली. 


दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनानं खेळ धिमा केला. किलियन एम्पाबे, उस्मान डेम्बेले आणि अँटोइन ग्रिजमन यांच्या सारख्या तगड्या गोल स्कोरर्सला शांत ठेवलं. त्याच बचावात्मक पावित्र्याच्या जोरावर अर्जेंटिनानं आपली आघाडी कायम राखली. त्याचबरोबर मेसीनं आपल्या बाजूनं आक्रमक खेळ कायम ठेवला. ६० व्या मिनिटाला मेसीनं आणखी एका गोलसाठी प्रयत्न केला. पण, त्याला यश आलं नाही.  


64 व्या मिनिटाला गोल झळकावणारा एंजल दी मारिया मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी मार्कस अकुना मैदानात आला. तिकडे ४० व्या मिनिटाला फ्रान्सनं दोन बदल केले होते. पण त्याचा फार फायदा झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये ७० व्या मिनिटाला फ्रान्सने आणखी दोन बदल केले. त्याला प्रमुख मिडफिल्डर ग्रिजमनचा समावेश होता. 


७८ व्या मिनिटाला खेळात सर्वात मोठा ट्विस्ट आला. निकोलस ओटामेंडीनं गोल वाचण्याच्या नादात फ्रान्सला पेनल्टी बहाल केली. त्याच संधीचा फायदा घेत किलियन एम्बापेनं गोल स्कोर केला. आणि २-०नं पिछाडीवर असलेल्या फ्रान्सचं खातं उघडलं. ८० व्या मिनिटाला २-१ असा स्कोर केला. पण, पुढच्या काही सेकंदांमध्ये अर्जेंटिनाच्या डिफेन्सला फोडून काढत एम्बापेनं ८१ व्या आणखी एक गोल केला आणि सामन्यात फ्रान्साला बरोबरी आणली. ७९ मिनिटं सामन्यात पिछाडीवर असलेल्या फ्रान्स आपलं ताकद दाखवून दिली. आणि सामना बरोबरीत केला.


90 मिनिटानंतर मेसीला आणखी एक संधी मिळाली होती. पण, फ्रान्सचा कर्णधार ह्युगो लॉरिसनं अप्रतिम बचाव करत मेसीचं आक्रमण हाणून पाडला. त्यामुळे सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ जोडण्यात आली. पण, त्यातही दोन्ही संघाचा स्कोर २-२ असाच होता. त्यामुळे 30 मिनिटाचा एक्ट्रा टाईम देण्यात आला. 


90 मिनिटांनंतर खेळ सुरु झाला. अर्जेंटिनानं आक्रमक खेळ सुरु केला. आणि मेसीची जादू चालली. अतिरिक्त वेळाच्या पहिल्या १५ मिनिटांमध्ये कोणत्याही संघाला गोल मारता आला नाही. त्यामुळे 105 मिनिटांनंतरही दोन्ही संघांमध्ये गोल रेषा 2-2 अशीच होती. पण, सामन्याचे शेवटचे 15 मिनिटं सुरु झाले आणि खेळातला थरार आणखी वाढला. 108 व्या मिनिटाला मेसीनं पुन्हा कमाल दाखवली आणि फ्रान्सच्या डिफेन्सला फोडून गोल डागला. आणि सामन्यात 3-2 अशी आघाडी मिळवली. अर्जेंटिना विश्वचषकावर नाव कोरणारं हे पक्कं झालं होतं. 


पण, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं म्हणत एम्बापेनं कमाल केली. आणि पेनेल्टी मिळवली. अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी जल्लोष सुरु केला होता. पण, 118 व्या मिनिटाला एम्बापेनं पेनेल्टीवर गोल करत, सामन्यात जोरदार पुनरागम केलं. आणि 130 मिनिटांनंतर स्कोर झाला 3-3 फ्रान्सच्या किलियन एम्बापेनं तीन  मिनिटांमध्ये दोन गोल करत आणखी एक इतिहास घडवला. 


फ्रान्सकडून किलियन एम्बापेनं पहिला गोल केला. फ्रान्सला आघाडीवर नेल. पण त्यानंतर फ्रान्सच्या दोन खेळाडूंना गोल करता आला नाही. दुसरीकडे मेसीसेनेनं सलग तीन गोल केले होते. आणि पेनेल्टी शूटआऊटवर आपला ताबा मिळवला होता. चौथी किक फ्रान्सच्या रान्डाल कोलो माओनीनं मारली, गोलही केला. त्यानंतर अर्जेंटिनाच्या गोन्झालो मॉन्टिएलनं गोल केला आणि विश्वचषकावर नाव कोरलं. 


विश्वचषकात याआधीही पेनेल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनानेच विजय मिळवला होता. आणि त्याचा शिल्पकार ठरला होता गोलकीपर इमिलियानो मार्टिनेझ.


अर्जेंटिनाची आज सहाव्यांदा अंतिम सामना खेळत होती. तर फ्रान्सचा चौथाच अंतिम सामना होता. १९८६ साली दिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने शेवटचा विश्वचषक जिंकला होता. त्याआधी १९७८ सालीही अर्जेंटिनानं विश्वचषक जिंकला होता.  त्यानंतर अर्जेंटिनाला ही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. दुसरीकडे, फ्रान्सने १९९८ आणि २०१८ मध्ये वर्ल्डकप जिंकला होता.