BBL 2022 23 : क्रिकेटच्या T20 प्रकारात अनेकदा फलंदाजांना थोडं जास्तच महत्व असते. कारण या फॉरमॅटमध्ये तुम्हाला वेगवान फलंदाजीसह अनेक गोष्टी पाहायला मिळतात. येथे तुम्हाला 20 षटकांमध्ये सर्वोच्च स्कोअर ते सर्वात कमी स्कोअर देखील दिसेल. कमी चेंडूत जास्त धावा कराव्या लागत असल्याने हा फॉरमॅट अनेकांना आवडतो. बिग बॅश लीगच्या 2022-23 हंगामात टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचणारा सामना पाहायला मिळाला. या लीगमध्ये सिडनी थंडर आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात T20 च्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या झाली. या दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना सिडनी थंडरचा संघ अवघ्या 15 धावांत ऑलआऊट झालाय. T20 क्रिकेटच्या इतिहासातील पाच सर्वात कमी धावसंख्या जाणून घेऊया.
1 ) थायलंड विरुद्ध मलेशिया (2022)
याच वर्षी थायलंड आणि मलेशिया यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात एक विक्रमी धावसंख्या झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या थायलंडचा संघ 13.1 षटकात 30 धावांवर सर्वबाद झाला.
2 ) तुर्की वि लक्झेंबर्ग (2019)
2019 मध्ये तुर्की आणि लक्झेंबर्ग यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला तुर्की संघ अवघ्या 28 धावांवर गारद झाला होता. लक्झेंबर्गने हा सामना 8 गडी राखून जिंकला.
3 ) लेसोथो वि युगांडा (2021)
लेसोथो आणि युगांडा यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेला लेसोथोचा संघ 26 धावांत सर्वबाद झाला. या सामन्यात युगांडाने 10 गडी राखून विजय मिळवला.
4 ) तुर्की वि झेक रिपब्लिक (2019)
2019 मध्ये तुर्की आणि झेक रिपब्लिक यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात तुर्कीचा संघ 278 धावांचा पाठलाग करताना केवळ 21 धावांवर ऑलाआऊट झाला. यामध्ये झेक रिपब्लिकने 257 धावांनी विजय मिळवला.
5 ) सिडनी थंडर्स विरुद्ध अॅडलेड स्ट्रायकर्स (2022)
बिग बॅश लीग (2022-23) मध्ये सिडनी थंडर्स आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात 139 धावांचा पाठलाग करताना सिडनी थंडर्सचा डाव केवळ 15 धावांवर आटोपला. टी-20 च्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या ठरली.
महत्वाच्या बातम्या