Kolhapur Football : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूरचा फुटबाॅल हंगामाला 27 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. शाहू छत्रपती के. एस. ए. फुटबॉल लिग ए डिव्हीजन सामन्यांनी छत्रपती शाहू स्टेडियम येथील फुटबॉल मैदानावर ​हंगामाला सुरुवात होईल. लीग अंतर्गत नोंदणीकृत 16 संघांचे सिनियर सुपर- 8 व सिनियर - 8 या दोन गटातंर्गत एकूण 56 सामने होणार आहेत. दररोज दोन सामने होतील. अनुचित प्रकार टाळण्यासाठी ​स्टेडियमम​ध्ये व प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही ​कॅमेरा लावण्यात आले आहेत. पहिल्या फेरीतील पहिला सामना फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ अ यांच्यामध्ये दुपारी 2 वाजता तर श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ अ यांच्यामध्ये संध्याकाळी 4 वाजता होईल. (Kolhapur Football)


फुटबॉल महासंग्रामकडून फुटबॉल भूषण सन्मान देऊन गौरवण्यात येणार


दरम्यान, फुटबॉल महासंग्रामकडून कोल्हापूर फुटबॉलला शिस्त लागावी यासाठी फुटबॉल भूषण सन्मान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केएसए लीग व सर्व स्पर्धा संपल्यानंतर फुटबॉल खेळाडूंचा आणि संघांचा फुटबॉल भूषण सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू या सर्वांसाठी पात्र असतील. जिल्ह्याबाहेरील एकाच खेळाडूला स्वतंत्र पुरस्कार देण्यात येईल. तज्ज्ञ समितीकडून फुटबॉल भूषण सन्मानासाठी निवड होईल. 


सर्वोत्तम संघ, शिस्तबद्ध संघ, प्लेयर ऑफ द इयर, उदयोन्मुख खेळाडू, सर्वोत्तम फॉरवर्ड, सर्वोत्तम हाफ, सर्वोत्तम डिफेन्स, सर्वोत्तम गोलकीपर, सर्वोत्तम जिल्ह्याबाहेर खेळाडू, सर्वोत्तम प्रशिक्षक, सर्वोत्तम संघ व्यवस्थापक, सर्वोत्तम स्पर्धा संयोजक, सर्वोत्तम क्रीडा वार्तांकन, सर्वोत्तम क्रीडा छायाचित्रकार, सर्वोत्तम क्रीडा वार्तांकन, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्वोत्तम पंच ,सर्वोत्तम शिस्तबद्ध संघ समर्थक अशा विभागात पुरस्कार दिले जाणार आहेत. फुटबॉल भूषण जीवन गौरव पुरस्कारही घोषित केला जाणार आहे. फुटबॉल भूषण मानांकन साठी निवड समितीने नियमावली केली आहे. 2022 आणि 2023 या वर्षातील केएसए लीग व सीनियर संघाचा सर्व स्पर्धातील सहभाग नोंदणीकृत खेळाडूला पुरस्कार देण्यात येणार आहे. (Kolhapur Football)


गेल्या दोन वर्षांची प्रतीक्षा


गेल्या दोन वर्षात निर्बंधांमुळे कोल्हापूर क्लबने एकाही परदेशी खेळाडूला संघात घेतले नव्हते. जिल्ह्यातील सर्वोच्च क्रीडा संस्था असलेली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन कोल्हापूरच्या बाहेरील जास्तीत जास्त तीन खेळाडूंना प्रवेश देण्यास परवानगी देते. यापैकी दोन परदेशी असू शकतात. कोल्हापूरचे क्लब परदेशी खेळाडूंची वर्षभरातील कामगिरी पाहून त्यांच्याशी संपर्क साधतात. राष्ट्रीय लीगमध्ये खेळणाऱ्या स्थानिक खेळाडूंकडून शिफारस मिळाल्यानंतरही काहीजण येतात. बहुतेक संघ स्ट्रायकरच्या स्लॉटसाठी परदेशी लोकांना प्राधान्य देतात.


इतर महत्वाच्या बातम्या