First Women Maharashtra Kesari : राज्यात उत्सुकता लागून राहिलेल्या महिला महाराष्ट्र केसरीचा महामुकाबला आज सांगलीत रंगणार आहे. कधीकाळी रुम पार्टनर राहिलेल्या दोन मैत्रिणींमध्ये अंतिम लढत होत असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष बाब म्हणजे, सांगलीकर तुंग गावची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील आणि यांच्यामध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अंतिम सामना होत आहे. त्यामुळे वैष्णवी पाटील सांगलीला पहिल्या महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देणार की, कल्याणची प्रतीक्षा बाजी मारणार याची उत्सुकता आहे. सांगलीत आज (24 मार्च) सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
उपांत्य लढतीत प्रतीक्षा बागडीची लढत कोल्हापूरची पैलवान अमृता पुजारीशी झाली. या लढतीत प्रतीक्षाने 9-2 ने अमृताचा पराभव करत महिला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. दुसरी उपांत्य लढत कल्याणची वैष्णवी पाटील आणि कोल्हापूरची पैलवान वैष्णवी कुशप्पा या दोघींमध्ये झाली. या लढतीत 11-1 ने वैष्णवीने कुशप्पाचा पराभव करत महिला अंतिम फेरी गाठली.
प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील या हरियाणाच्या इसारमध्ये जवळपास 5-6 ते महिने रूमपार्टनर होत्या. दोघींना डावपेचांबद्दल अंदाज आहे. त्यामुळे या दोघी महाराष्ट्र महिला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात कोणता डावपेच वापरून आपल्या मैत्रिणीचा पराभव करण्याचा प्रयत्न करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
दोघींमधील बलाबल
प्रतीक्षा रामदास बागडी (वय 21, वजन 76)
- सांगलीच्या तुंग गावची महिला पैलवान
- वसंत कुस्ती केंद्र सांगलीमध्ये सराव करते
- अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्ये प्रतीक्षाकडू पदकांची कमाई
- खेलो इंडियामध्ये सिल्वर पदकाची कमाई
- राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सीनियर गटात सिल्वर पदकाची कमाई
वैष्णवी पाटील , कल्याण (वय 19 वजन 65)
- कल्याणची महिला पैलवान
- जय बजरंग तालीम संघ, नांदीवलीमध्ये सराव करते
- विशाखापट्टणम येथे सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप
- ब्राँझ मेडलची कमाई
महत्वाच्या इतर बातम्या :