FIH Hockey Womens World Cup : काही दिवसांतच महिलांच्या हॉकी विश्वचषकाला (FIH Hockey Women's World Cup 2022) सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचा हॉकी विश्वचषक 2022 ही स्पर्धा 2 जुलैपासून स्पेनच्या भूमीत सुरु होणार आहे. 16 देशांचे संघ सामिल होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय महिलाही सामिल असून नुकतीच 20 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी सविताकडे (Savita) कर्णधारपद तर उपकर्णधारपद दीप ग्रेस एक्का (Deep Grace Ekka) हिच्याकडे सोपवण्यात आलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेने ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.

 

कसा आहे भारतीय महिला संघ?

नवज्योत कौर, गुरजीत कौर, एक्का दीप ग्रेस (उपकर्णधार), मोनिका, सोनिका, शर्मिला देवी,निक्की प्रधान, सविता (कर्णधार), निशा, वंदना कटारीया, खारीबम बिचू देवी, उदिता,लालरेमसियामी, ज्योती, नवनीत कौर, पुखराबम सुशिला चानू, सलिमा टेटे, नेहा, अक्षता आबासो ढेकळ, संगिता कुमारी 

भारतीय महिला संघाचं विश्वचषकातील वेळापत्रक-

सामना तारीख वेळ
 भारत विरुद्ध इंग्लंड 3 जुलै सायंकाळी 8 वाजता
भारत विरुद्ध चीन 5 जुलै सायंकाळी 8 वाजता
भारत विरुद्ध न्यूझीलंड  7 जुलै सायंकाळी 8 वाजता

FIH च्या रँकिंगमध्ये महिला हॉकी संघाला फायदा   

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची गुणतालिका काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. यावेळी महिलांच्या क्रमवारीत अर्जेंटिना (26744.837) दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया (2440.750), इंग्लंड (2204.590) आणि जर्मनी (2201.085) अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. भारतीय संघानं (2029.396) एका स्थानानं आघाडी घेत सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, या क्रमवारीत स्पेन (2016.149) सातव्या स्थानावर आहे. यानंतर बेल्जियम, न्यूझीलंड आणि जपानचा संघ टॉप 10 मध्ये आहे.

हे देखील वाचा-