Fifa World Cup 2022 : जगातील बहुतांश देश खेळत असणारा खेळ म्हणजे फुटबॉल (Football). क्रिकेटच्या तुलनेतही अधिक प्रसिद्ध असणाऱ्या फुटबॉलचा विश्वचषक यंदा कतार (Qatar) येथे पार पडणार आहे. दरम्यान नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार विश्वचषक सुरु होण्याची तारीख बदलली असून एक दिवस आधी सामने सुरु होणार आहेत. आधी 21 नोव्हेंबर, 2022 पासून सुरु होणारी स्पर्धा आता 20 नोव्हेंबर, 2022 रोजी सुरु होणार आहे.


विशेष म्हणजे यंदाही पहिला सामना हा यजमान संघाचा होणार असून कतार हा संघ इक्वेडोर विरुद्ध (Qatar vs Ecuador) मैदानात उतरणार आहे. दरम्यान इंग्लंड आणि इराण यांच्यातील सामना हा 21 नोव्हेंबर रोजीच होणार असून फक्त आता हा स्पर्धेचा ओपनिंग सामना असणार नाही. दरम्यान या बदललेल्या डेटबद्दल अधिकृत माहिती फिफाने दिली नसली तरी बऱ्याच रिपोर्टमधून ही माहिती समोर आल्याने आता केवळ फॉर्मेलिटी म्हणून फिफा लवकरच याची माहिती देईल.




 सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा


1930 साली सुरु झालेली ही जगातील एक सर्वात जुनी स्पर्धा फिफा यंदा कतारमध्ये पार पडत आहे. 20 नोव्हेंबर, 2022 पासून सुरु होणारी ही स्पर्धा जवळपास महिनाभर चालेल. तब्बल 32 देश स्पर्धेत सहभागी होतील. ग्रुप स्टेजच्या सामन्यानतर राऊंड 16 आणि मग पुढील सामने पार पडणार आहेत. 18 डिसेंबर रोजी स्पर्धेची फायनल रंगणार आहे. 


हे देखील वाचा-